इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन शाळेसमोर सोमवारी (दि. १२) मध्यरात्री दुचाकीस्वार तरूणाला अडवून चौघांनी त्याच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी लुबाडून नेली. सीसी टीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे. याप्रकरणी तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा तरुण सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरुन लक्ष्मी रस्त्याने निघाला होता.
सेवासदन शाळेसमोर दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी त्याला अडवले व त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. घाबरलेल्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी लक्ष्मी रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.