Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुन्हा हिट अॅण्ड रन प्रकरण...! पिंपरी-चिंचवडमध्ये कारचालकाने दुचाकीला नेले फरफटत; थरारक घटना...

पुन्हा हिट अॅण्ड रन प्रकरण…! पिंपरी-चिंचवडमध्ये कारचालकाने दुचाकीला नेले फरफटत; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघाताच्या घटनेने शहर हादरून गेलं आहे. असं असतानाही आता पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमध्ये हिट ॲण्ड रनचं प्रकरण समोर आलं आहे. येथील पिंपळे गुरव परिसरात ७ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला आहे.

चारचाकी चालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरफट नेल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी चालकासह इतर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत तक्रार दाखल नसल्याने ताब्यात घेतलेल्या कार चालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार चालकाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात सात ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव चारचाकी आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या चारचाकी वाहन चालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरफटत नेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेत दुचाकी चालकासह इतर एक जण जखमी झाला आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताच्या दिवशी कार चालकाविरोधात तक्रार नसल्याने ताब्यात घेतलेल्या कारचालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले. मात्र, दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील सांगवी पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला नाही. परंतु, घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर सांगवी पोलीस तत्परतेने कारचालकाचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments