Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजशिरुर तालुक्यात टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; बहीण-भावाला ५० फुट नेले फरफटत, विद्यार्थिनीचा...

शिरुर तालुक्यात टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; बहीण-भावाला ५० फुट नेले फरफटत, विद्यार्थिनीचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिक्रापूर, (पुणे) : शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील मांडवगण फराटा गावापासुन जवळ असलेल्या कोळपेवस्ती येथे अपघाताची घटना घडली आहे. मालवाहू टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रावणी देविदास थोरात (वय-१५) असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर निरंजन देविदास थोरात (वय १३) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नववा आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि.९) साडे चार ते पावणे पाचच्या दरम्यान शाळेतून घरी जाताना घडली आहे. तिच्या पाठीमागे बसलेला तिचा भाऊ थोडक्यात बचावला आहे. याबाबत देविदास नानासो थोरात यांनी मांडवगण फराटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणी थोरात इयत्ता नववी आणि तिचा भाऊ निरंजन थोरात इयत्ता सातवी मध्ये वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत शिकत होते. सायंकाळी सव्वा चार वाजता शाळा सुटल्यानंतर ते दोघेही दुचाकी क्रं एम एच १२ ई जी ५१७४ वरुन घरी जात असताना कोळपेवस्ती येथे समोरुन येणारा भरधाव (एम एच ४२ बी पी ३१३२) टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पो चालकाने दोन्हीही मुलांना ५० फुट फरफटत नेले. यावेळी श्रावणी हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच भाऊ निरंजन याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक मुलांना मदत न करताच पळून गेला. श्रावणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी न्हावरा येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments