इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : प्रेमसंबंधाना मुलीच्या घरच्यांनी विरोध केल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल रेहमान बागवान आणि त्याचे साथीदार आयान, महमद सुफियान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोंढव्यातील साईबाबानगर येथे मंगळवार ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची बहिण व रेहमान यांच्या प्रेमसंबंधांना घरच्यांनी विरोध केला होता. या गोष्टीचा राग मनात धरुन रेहमान याने फिर्यादी याला शिवीगाळ केली व त्याच्या जवळील पट्ट्याने मारहाण केली. तसेच आयान, महमद आणि सुफियान यांनी लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करत जखमी केले. फिर्यादीला वाचविण्यासाठी त्याचे वडिल आले. त्यावेळी आरोपी पळून जात असताना रेहमान याच्या जवळ असणारा लोखंडी कोयता खाली पडला.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.