इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर : गटारी अमावस्येला मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर किरकोळ कारणावरून तरुणावर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. हि घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दिल्लीवाला गोठा परिसरात रविवारी (ता.4) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोहेल इसाक शेख (वय 20 वर्षे, धंदा क्लिनर, रा. आलिफनगर, थेऊर, ता. हवेली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दिपक जाधव (वय-24), सनी पवार (वय-24), विजय जाधव (वय-18, सर्व रा. थेऊर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहेल शेख व त्यांचे मित्र सुरज शेख, प्रविण चोपटे, विजय जाधव, सनी पवार, दिपक जाधव व विनायक गाढवे हे गटारी अमावस्या निमित्त जेवण करण्यासाठी थेऊर नायगाव रस्त्यावरील दिल्लीवाला गोठा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.
दरम्यान, जेवण झाल्यानंतर आरोपी दिपक जाधव, सनी पवार, विजय जाधव काहीही कारण नसताना फिर्यादी सोहेल शेख यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच आरोपीपैकी सनी पवार याने धारदार हत्याराने फिर्यादी सोहेल शेख यांच्या डोक्यात मारुन वार केला. या हाणामारीत सोहेल शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी सोहेल शेख यांनी वरील तिन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.