Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजसंतापजनक...! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मित्राच्या रूमवर बलात्कार; आईला जीवे मारण्याची धमकी;...

संतापजनक…! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मित्राच्या रूमवर बलात्कार; आईला जीवे मारण्याची धमकी; शिरुरमधील प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही तर, आरोपीने मुलीसह तिच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अक्षय फुलचंद सोनके (वय 22, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. बनसारोळा, ता. केज जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रांजणगाव गणपती एका अल्पवयीन मुलीला आरोपी अक्षय याने ‘तुला खाऊ देतो, तुला फिरायला घेऊन जातो’, असे सांगून दुचाकीवर बसवून मित्राच्या रूमवर घेऊन गेला. त्या ठिकाणी जबरदस्तीने मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, आरोपी अक्षयने तू कोणालाही काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

घरी गेल्यानंतर मुलगी रडत असल्याने तिच्या आईने विचारले. त्यावेळी अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. याबाबत पीडित मुलीच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments