Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजडॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे २ वर्षापासून महिला अंथरुणाला खिळून; बोलताही येईना, पुण्यातील प्रकार

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे २ वर्षापासून महिला अंथरुणाला खिळून; बोलताही येईना, पुण्यातील प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियामध्ये हलगर्जीपणा केल्याने गेल्या दोन वर्षांपासून एक अभियंता महिला अंथरुणाला खिळून आहे. ही घटना १६ ऑक्टोबर २०२२ रोजी एरंडवणा येथील डिझायर क्लिनिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अभियंता महिलेच्या ३६ वर्षीय पतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. प्रशांत यादव (रा. गुरुग्राम, हरियाणा), डॉ. स्वप्नील नागे (रा. नन्हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी खराडी येथील एका कंपनीत क्वालिटी इंजिनियर म्हणून काम करत होती. त्यांचे वजन जास्त असल्याने एरंडवणे परिसरातील डिझायर क्लिनिक येथे वजन कमी करण्यासाठी संपर्क साधला. आणि वजन कमी करण्याबाबतच्या उपचारपद्धतींची माहिती घेतली. त्यावेळी रुग्णालयातील स्वागतकक्षातील कर्मचाऱ्यांनी लिपोसक्शन शस्त्रक्रिया वजन कमी करण्यासाठी केली जात असल्याचे सांगून ते करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, १६ ऑक्टोबर २०२२ रोजी अभियंता महिलेवर लिपोसक्शन शस्त्रक्रिया करून साडेचार लिटर मेद (फॅट) काढण्यात आले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर अभियंता महिला अत्यवस्थ झाली. त्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करताना भूल दिल्यानंतर पल्स रेट, रक्तदाब कमी झाला, तसेच प्राणवायुचा मेंदूला पुरवठा न झाल्याने मेंदूला इजा झाली.

त्यानंतर खासगी रुग्णालयात अभियंता महिला तीन महिने उपचार घेत होती. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तेव्हापासून पत्नी अंथरुणाला खिळून आहे, तसेच त्यांना बोलता देखील येत नसून फक्त डोळे उघडझाप करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments