इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी (पुणे): खुन्नस दिल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घरातून बाहेर ओढत बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २९) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास साखरेवस्ती, हिंजवडी येथे घडली.
योगेश भास्कर भालेराव (वय २४, रा. साखरेवस्ती, गणपत कॉलनी, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण लोखंडे (रा. काळाखडक, वाकड), विष्णू पवार (रा. वडगाव मावळ), बाबू खान (रा. काळा खडक, वाकड), अरविंद कोळी (रा. वाकड), रुषि जाधव (रा. तळेगाव) आणि साहिल सुरुशे (रा. हिंजवडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी खुन्नस देण्याच्या कारणावरून योगेश यांना घराच्या बाहेर ओढून आरोपी लोखंडे याने हाताने मारहाण केली. आरोपी विष्णू याने फिर्यादीचा जीव जाईल, याची जाणीव असतानाही योगेशवर कोयत्याने वार केला. परंतु, तो कोयत्याचा वार योगेश यांनी चुकविल्याने गाडीवर बसून त्यांच्या दुचाकी गाडीचे नुकसान झाले. इतर आरोपींनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील कोयता हवेत फिरवून योगेश यांना सोडविण्यासाठी आलेल्यांना म्हणाले की, आमच्या भांडणात कोणी आल्यास त्यास संपवून टाकीन. आम्ही या एरियाचे डॉन आहोत, असे म्हणून दहशत निर्माण केली.