Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूज8 व्या वेतन आयोगापूर्वीच कर्मचाऱ्यांना 'गिफ्ट'; केंद्र सरकारने केली महागाई भत्त्यात वाढीची...

8 व्या वेतन आयोगापूर्वीच कर्मचाऱ्यांना ‘गिफ्ट’; केंद्र सरकारने केली महागाई भत्त्यात वाढीची घोषणा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतनआयोगापूर्वीच एक गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 2 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. या वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई 53 टक्क्यांवरून 55 टक्के होईल. 8 व्या वेतन आयोगापूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारणे हे या वाढीचे उद्दिष्ट असणार आहे.

जुलै 2024 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी दिली होती. गेल्या वेळी महागाई भत्त्यात 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 2% वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या दुरुस्तीमुळे डीए 53 टक्क्यांवरून 55 टक्के होईल. सातव्या वेतना आयोगांतर्गत, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते, जी सहामाही आधारावर केली जाते.

जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50 हजार रुपये असेल तर महागाई भत्ता वाढण्यापूर्वी हा महागाई भत्ता 26,500 रुपये होता. त्याचवेळी, आता ते 27,500 रुपये होईल. म्हणजेच 50 हजार रुपये मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 1000 रुपयांची वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2 टक्के नवीन वाढ 1 जानेवारी 2025 पासून प्रभावी मानली जाईल. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात ते जोडून जानेवारी आणि फेब्रुवारी तसेच मार्च महिन्यासाठी महागाई भत्ता दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments