Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूज70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना ...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली असून आरोपी फरार झाले आहे. बारा वर्षाच्या मुलाचे कात्रज भागातील भिलारवाडी येथून राजेश सुरेश शेलार या आरोपीने 18 फेब्रुवारीच्या सुमारास अपहरण केले होते.

70 लाख दिले तर मुलाला सोडण्यात येईल असे सांगितले. तसेच पोलिसात तक्रार दिली तर मुलाचा जीविताचे बरे वाईट करण्याची धमकी दिली होती. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 18 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन झोन २ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे सहाय्यक नंदिनी वग्यानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित मुलाची सुखरूप सुटका करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांची तीन वेगेवेगळी पथके स्थापन करून रवाना करण्यात आली.

तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे तपास पथके सातारच्या दिशेने रवाना झाली. आरोपी पीडित मुलाला घेऊन पाटेघर ता. जि. सातारा येथील डोंगरामध्ये लपले असल्याची माहिती मिळाली. यानंतर भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखा युनिट 2 चे पथकांनी स्थानिक सातारा एलसीबीचे अरुण देवकर व त्यांचा पोलीस स्टाफ याचे मदतीने पाटेघर येथील डोंगर परीसर पिंजुन काढत असताना आरोपींना पोलीस आल्याची चाहुल लागल्याने त्यांनी पीडित मुलांस डोंगरात अंधारामध्ये पळुन गेले. यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी फरार असुन त्याचा पोलीस पथके शोध घेत आहेत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त (झोन परिमंडळ २) स्मार्तना पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, आणि गुन्हे शाखा, युनिट २, अमोल रसाळ व सातारा स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या स्टाफने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments