Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज 6 वर्षाच्या मुलीचा 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग: कोंढवा पोलिस ठाण्यात ...

6 वर्षाच्या मुलीचा 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग: कोंढवा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सात वर्षाच्या मुलीस 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकानी जवळ बोलून तिचा शरीराला आक्षेपार्ह स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी साहेबराव धर्माजी घाईतडके (वय-65, राहणार बिबेवाडी, पुणे) या आरोपी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या 43 वर्षीय आईने आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित आरोपी हा महिला राहत असलेल्या सोसायटीमध्ये आला होता. सदर सोसायटीच्या लिफ्टमध्ये त्यानी तक्रारदार यांची सात वर्षाची मुलगी हिला जवळ बोलून तिला पाठीमागून पकडून तिच्याशी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर घाबरलेली मुलगी घरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत, आरोपी विरोधात मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी साहेबराव घायतडके याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे याबाबत पुढील तपास करत आहे.

13 वर्षाच्या मुलीचा पाठलाग करून विनयभंग

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेली एक १३ वर्षीय मुलगी आठवी इयत्तेत शिक्षण घेत आहे. संबधित मुलगी शाळा व क्लासला ये जा करत असताना, तिचा मागील सहा महिन्यांपासून एका तरुणाने वारंवार पाठलाग केला. संबंधित मुलगी ही क्लास वरून घरी येत असताना, मुलगी अल्पवयीन असल्याचे आरोपीला माहिती असून सुद्धा तिचा पाठलाग करून तिच्यासमोर आरोपीने गाडी आडवी लावली आणि तिला अडवले.

त्यानंतर तिच्या हाताला व शरीराला हात लावून त्याने शरीर संबंधाची मागणी करत मुलीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी मुलीच्या 41 वर्षीय वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी धीरज नितीन शिंपी (वय 21, राहणार- मांजरी, पुणे) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी विनयभंग आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करत आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments