Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूज500 सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोरट्याला बेड्या व्यापाऱ्याच्या 11.50 लाखांवर मारला होता डल्ला

500 सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोरट्याला बेड्या व्यापाऱ्याच्या 11.50 लाखांवर मारला होता डल्ला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

व्यापाऱ्यांवर पाळत ठेऊन त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील साडे अकरा लाखांची रोकड चोरणाऱ्याला सराईताला समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. चोरट्याच्या माग काढण्यासाठीखडक पोलिसांनी सलग आठ दिवस घटनास्थळापासुन ते दिघी, विश्रांतवाडी परिसरातील सरकारी व खाजगी असे ५०० पेक्षा जास्त सीसीटिव्हीची तपासणी करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

रामकेवल राजकुमार सरोज उर्फ राकेश प्रदीपसिंग रजपुत (वय-४६, सध्या रा-शिक्रापुर रोड चाकण, मुळ रा. पौधीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २ फेब्रुवारी रोजी टिंबर मार्केट भवानी पेठ मधील पार्किंग मधून एका व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून सफाईदारपणे साडे अकरा लाखांची रोकड चोरण्यात आली होती. याप्रकरणी महेश शिवाजी नाळे, वय ३४, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

टिंबर मार्केट सारख्या व्यापारी परिसरातून भर दिवसा साडे अकरा लाख रोकड चोरून नेल्यानेची तात्काळ दखल खडक पोलिसांनी घेतली. यासाठी दोन तपास पथके नेमण्यात आली. प्राथमिक तपासात चोरट्याने दुचाकींचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकाने सलग आठ दिवस घटनास्थळापासुन ते दिघी, विश्रांतवाडी परिसरातील सरकारी व खाजगी असे ५०० पेक्षा अधिक सीसीटिव्हीचे फुटेज तपासुन चोरट्याचा माग काढला. यादरम्यान व्यापाऱ्यांची रोकड चोरणारा चोरटा हा बोपखेल फाटा येथे थांबला असून पळून जाण्याची तयारीत असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली होती. यानंतर खडक पोलिसांनी सापळा रचून चोरट्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने आपले नाव रामकेवल राजकुमार सरोज असल्याचे सांगत गुन्ह्याची कबुली दिली.

चोरलेली रोकड बँक खात्यात जमा केली आरोपी रामकेवल सरोज याने चोरी केलेल्या साडे अकरा लाखांपैकी काही रक्कम ही अहमदनगर येथील बैंक ऑफ बडोदा, चाकण येथील ऍक्सिस बैंकच्या स्वतःच्या खात्यावर तसेच पत्नीच्या उत्तरप्रदेश येथील सेन्ट्रल बैंक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावर जमा केली होती. खडक पोलिसांनी संबंधित बँकांशी पत्रव्यवहार करुन रामकेवल सरोज आणि त्याच्या पत्नीचे बँक खाते गोठवले आहेत. तसेच रामकेवल सरोजकडे चोरीच्या गुन्हयात वापरण्यात आलेल्या दुचाकी संदर्भात विचारणा केली असता त्याने ही दुचाकी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड,, पालीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राउत, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस अंमलदार संदिप तळेकर, किरण ठवरे, हर्षल दुडम, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर फुडले, लखन डाबरे, प्रशांत चडदे, रफिक नदाफ, आशिष चव्हाण यांचे पथकाने कली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments