Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूज16 वर्षीय मुलाच्या खुनातील आरोपी जेरबंदः सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीला अटक करण्यात...

16 वर्षीय मुलाच्या खुनातील आरोपी जेरबंदः सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीला अटक करण्यात यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

व्हेलेंटाईन डेच्या दिवशी भिवंडीत वहाळदेवी नगर येथे एका १६ वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याचे कपडे काढून त्यास बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. या गुन्हयातील पसार झालेला आरोपी बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोशि ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करताना दिसून आल्याने, त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेत पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याने भिवंडीतील मुलाचा खुन केल्याची कबुली दिली अाहे.

याप्रकरणी रामनाथ ऊर्फ पापा मेमीनाथ सोनवणे (वय-२२, रा. ताडीवाला रोड, पुणे) या आरोपीस अटक करण्यात आली अाहे. संकेत सुनील भोसले असे खून झालेल्या मुलाचे नाव अाहे. भिवंडी येथे संकेत भोसले व देवा धोत्रे यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. त्यानंतर भोसले याने धोत्रे यास मारहाण केली होती. याचा राग आरोपींनी मनात धरला होता. रामनाथ सोनवणे व करण म्हेत्रे हे दोन अारोपी कारागृहात असताना त्यांची एकमेकांशी ओळख निर्माण झाली होती. म्हेत्रे याचा मामाचा मुलगा हा धोत्रे असल्याने त्यास मारहाण झाल्यानंतर याबाबतची माहिती म्हेत्रे याने सोनवणे यास दिली होती. त्यानुसार सोनवणे हा पुण्यातून भिवंडी येथे जाऊन त्याने साथीदारासह संकेत भोसले यास बळजबरीने दुचाकीवर बसवून नेत त्याचे अपहरण करुन त्याला साथीदारांसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन दगडाने, खुर्चीने मारहाण करत गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर भिवंडी पोलीस ठाण्यात सुनिल भोसले (वय-५०) यांनी सहा आरोपी विरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. तसेच या गुन्हयात पाच पाहिजे आरोपी होते. पोलिस पसार झालेल्या अारोपींचा शोध घेत असताना, बंडगार्डन पोलिसांना गस्त घालत असताना, सीसीटीव्ही फुटेजच्या मध्ये अारोपी रामनाथ सोनवणे दिसून आला. त्याला सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडे खुनाचे गुन्हयाची चौकशी केली असता त्याने भिवंडीत मुलाचा खुन केल्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई पश्चिम प्रादेशिक विभाग अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी संजय सुर्वे, वपोनि संदीपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पो.हवा सुधीर घोटकुले, पोशि ज्ञाना बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने केली अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments