Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूज14 वर्षाच्या मुलीला टेम्पोमध्ये घेऊन जात तीन महिने वारंवार बलात्कार; वाल्हेकरवाडी येथील...

14 वर्षाच्या मुलीला टेम्पोमध्ये घेऊन जात तीन महिने वारंवार बलात्कार; वाल्हेकरवाडी येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरीमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका टेम्पोचालकाने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आहे. हा प्रकार कासारसाई येथील चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी येथे एप्रिल २०२४ ते जून २०२४ या कालावधीत घडला आहे. त्यातूनच ही मुलगी गर्भवती राहिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून, हिंजवडी पोलिसांनी या नराधम टेम्पोचालकाला अटक केली आहे. कार्तिक ऊर्फ मंगेश कांबळे (वय-२३, रा. ढमाले वस्ती, कासारसाई) असे अटक केलेल्या आरोपीचे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आहे, असे माहित असताना देखील आरोपी कार्तिक कांबळे याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या घरातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी वारंवार मुलीला देत असे. आपल्या दोघात जे काही झाले आहे ते मी तुझ्या मित्र मैत्रिणींना सांगून टाकेन. आणि तु फालतु आहेस, अशी तुझ्या नावाची बदनामी करेल, अशी धमकी दिली आहे.

दरम्यान, घाबरुन या मुलीने कोणालाही तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला नाही. त्यामुळे त्याने या आलेल्या संधीचा फायदा घेत, वारंवार त्या मुलीला टेम्पोमध्ये घेऊन जात तिच्यावर लैगिक बलात्कार केला आहे. त्यात ही मुलगी गर्भवती राहिल्यामुळे हा घडलेला प्रकार समोर आला आहे. हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments