Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज 13 वर्षांपासून फरार आरोपीला पोलिसांकडून अटकः खूनाचा गुन्हा दाखल आरोपी लपला होता...

13 वर्षांपासून फरार आरोपीला पोलिसांकडून अटकः खूनाचा गुन्हा दाखल आरोपी लपला होता राजस्थानमध्ये

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

खून करून तब्बल 13 वर्ष फरार झालेल्या नाव बदलून विविध राज्यात वावरणाऱ्या एकाला चतुः श्रृंगी पोलिसांनी राजस्थान येथून बेड्या ठोकल्या. बिट्टी उर्फ शामबाबु छोटेलाल यादव (33, रा. मु. पो. हरा, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

दि. 15 मार्च 2011 रोजी सुपरवायझर बाबुराव मोघेकर हे सेनापती बापट रोडवरील अंबिका सोसायटी येथे वॉचमन म्हणून काम करणाऱ्या राजाजा यादव व बिट्टी यादाव यांना चेक करण्यासाठी गेले असताना, त्यांच्या वॉचमन यांना राग येऊन वादावादी झाली.

दोन्ही वॉचमन यांनी बाबुराव विठ्ठल मोघेकर यांना अंबिका सोसायटील येथील लिफ्टमध्ये तोंडात कापडी बोळा कोंबुन व त्यांचे हात व दोन्ही पाय रस्सीने बांधुकन खुन करून पसार झाले होते. त्यातील श्याम बाबु यादव हा स्वतःचे अस्तित्व लपवून व नाव बदलून विविध राज्यांमध्ये वावरत होता.

याबाबत चतुः श्रृंगी पोलिसांना आरोपी हा राजस्थानातील झालवाड जिल्ह्यात राहत असल्याी माहिती मिळाल्यानंतर पथक राजस्थान येथे रवाना करण्यात आले. तेथून शामबाबुला ताब्यात घेत अटक करण्यात आली. तेथील स्थानिक न्यायालयात त्याला हजर करून पुढे ट्रान्झिट रिमांडद्वारे पुण्यात आणण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक अंगत नेमाने, अमंलदार सचिन कांबळे, सुहास पोतदार, सुधाकर माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments