Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूज12 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई: पुणे परिमंडळ-4चे पोलिस उपायुक्त विजय मगर...

12 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई: पुणे परिमंडळ-4चे पोलिस उपायुक्त विजय मगर यांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील येरवडा, विमानतळ, चतुःशृंगी, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 12 गुन्हेगारांवर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी तडीपारीची कारवाई केली. आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हरजितसिंग ऊर्फ सोनु सरबजितसिंग सिध्दु (वय 45, रा, नागपुरचाळ, येरवडा), विकास ऊर्फ महाराज भगत तौर (वय 36, रा. लक्ष्मीनगर येरवडा), अजय गणेश राठोड, (वय 24, रा. जयजवान नगर येरवडा), रुपेश दिलीप आडागळे (वय 24, रा. जयप्रकाश नगर येरवडा), शंकर मानु चव्हाण, (वय 54, वर्षे, रा. पांडु लमाण वस्ती येरवडा). तर बळीराम सुदाम पतंगे, (वय 23, वर्षे, रा. खराडी, अरबाज असलम शेख, (वय 22 वर्षे, रा.एस.आर.ए. बिल्डींग विमाननगर), योगेश प्रकाश म्हस्के, (रा. यमुनानगर विमाननगर) असे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव.

याचबरोबर गणेश यमनप्पा कुर्डेकरी, (वय 24 वर्षे, रा. पांडवनगर), सोमनाथ ऊर्फ सोम्या धोत्रे, (वय 45 वर्षे, वडारवाडी) असे चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गौरव ऊर्फ महादु सातव (वय 33 वर्षे, रा. आव्हाळवाडी ता. हवेली) महेंद्र संभाजी कुटे, (वय 38 वर्षे, रा. आव्हाळवाडी ता. हवेली) या 12 जणांना पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे. पोलिस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार हे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, दहशत माजवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, तोडफोड करणे, घरफोडी, शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आरोपींच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता.

चौकशी पूर्ण केल्यानंतर या गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. यापुढील काळात देखील पोलीस उपआयुक्त परीमंडळ 4 हददीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतीबंधक कारवाई करुन गुन्हेगारीस प्रतिबंधक कामी भर देण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments