Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज 1 कोटी 67 लाखांची फसवणूकः जमीन विकसन करुन देण्याचा केला बहाणा,...

1 कोटी 67 लाखांची फसवणूकः जमीन विकसन करुन देण्याचा केला बहाणा, आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बाणेर येथील एक जमीन विकसन करताना एका व्यवसायिकाला आर्थिक अडचणी आल्याने त्याने कुणाल हौसिंगचे व्यवसायिक यांना सदर जमीन विकसन करण्यासाठी देण्याबाबतचा करार केला. मात्र, सदर व्यवहारात व्यवसायिकाची एक कोटी ६७ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मे. कुणाल हौसिंगचे भागीदार हेंमेंद्र डाहयाभाई शहा, रमेश गिरधरदास शहा व जितेंद्र सुरेश मेहता यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात अनुप विजय मुंदडा (वय-३७, रा. गुलटेकडी, पुणे) यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार ११/१०/२००५ ते ३१/१/२०२४ यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे कॉस्मो डेव्हलर्पस या भागीदारी फर्मने बाणेर येथील विकसनाकरीता घेतलेली जमीन आर्थिक अडचणीमुळे ते विकसित करु शकले नाही. त्यामुळे त्यांनी सदर जमीन हे विकसन करण्यासाठी कुणाल हौसिंगचे सर्व आरोपी भागीदार यांना विश्वासाने निव्वळ विकसित करण्यास दिली. परंतु आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन चांगला परतावा देण्याची हमी देऊन दिशाभूल केली. विकसन करारान्वये ठरलेल्या दोन कोटी १४ लाख ४६ हजार रुपये परताव्यापैकी एक कोटी ६७ लाख ८२ हजार रुपये इतकी रक्कम दिली नाही.

तक्रारदार यांनी दिलेल्या कुलमुखत्यार पत्रांचा गैरवापर करुन त्या जमीनीचे स्वतःचे नावे बेकायदेशीररित्या नोंदणीकृत खरेदीखत करुन ७/१२ वर स्वतःच्या नावांची बेकायदेशीररित्या नोंद करुन फसवणूक करण्यात आली आहे. तसेच तक्रारदार यांना आरोपींनी बघून घेण्याची धमकी दिली आहे. याबाबत पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

टास्कच्या बहाण्याने गंडा

कॅम्प परिसरात राहणाऱ्या उर्मिला मिथीलेश हिरणवाळे (वय-३०) यांना पार्ट टाईम जॉबसाठी एका अज्ञात व्यक्तीने संर्पक केला. त्यांना टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी सांगून तसेच विविध टास्क पुर्ण करण्यास सांगून तक्रारदार यांना सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचे मोबदल्यात १५०० रुपये देण्यात येऊन विश्वास संपादित करण्यात आला. त्यानंतर तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन जास्त पैशाचे अमिष दाखवून तक्रारदार यांचेकडून दोन लाख ८१ हजार रुपये स्वतःचे विविध बँक खात्यावर आरोपींनी घेऊन सदर रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत लष्कर पोलिस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments