इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
हिंजवडीः आयटी पार्क समजला जाणारा हिंजवडी-माण परिसर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येमुळे चर्चेत आला आहे. मंगळवारी सायंकाळी, कार्यालयीन वेळेत वाहतूक ठप्प झाली होती. साडेपाचच्या सुमारास सुरू झालेली ही कोंडी तब्बल तीन तास कायम राहिली. परिणामी, वाहनांच्या रांगा पाच किलोमीटरपर्यंत वाढल्या आणि हजारो नागरिक या गोंधळात अडकले.
हिंजवडीत कामावरून घरी जाणं म्हणजे दुसरं संकट
दररोज संध्याकाळच्या वेळी कामावरून घरी जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी हा अनुभव नवा राहिलेला नाही. मात्र मंगळवारीची परिस्थिती इतकी वाईट होती की, अनेक जण आपल्या वाहनांत अडकून राहिले. काही नागरिकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवून पायी जाणे जाणं पसंत केलं. जोरदार पाऊस नसतानाही नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
हिंजवडी परिसरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली असली, तरी रस्ते व पायाभूत सुविधांचा अभाव मात्र कायम आहे. उड्डाणपूल, पर्यायी मार्ग किंवा ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम याबाबत केवळ चर्चाच होत असल्याने स्थानिक रहिवासी रोजच्या त्रासाला कंटाळले आहे. अनेक नागरिकांनी “स्मार्ट सिटी” च्या नावाखाली होणाऱ्या जाहिरातींपेक्षा प्रत्यक्षात नियोजन आणि अंमलबजावणीची गरज असल्याचे ठामपणे सांगितले.