इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
हडपसर, (पुणे): हांडेवाडीकडून मंतरवाडीकडे निघालेल्या एका सिमेंटबल्करने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. आज सोमवारी (ता. 01) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी (ता. हवेली) हद्दीतील पंपाच्या समोर हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर दोघांचेही वय 40 ते 45 च्या दरम्यान असून दोघेही दुचाकीवरून गावी निघाले असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. तसेच त्यांची नावे व कोठे राहतात याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. सदर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
दरम्यान, हांडेवाडी – मंतरवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डंपर वसिमेंट बल्कर, अवजड वाहनांची वर्दळ असते त्यामुळे या परिसरात वारंवार अपघात होत आहेत. व अनेकांचा जीव जात आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोपी नागरिक करू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात अपघात टाळायचे असल्यास डंपर व सिमेंट बल्कर, अवजड वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.