Monday, June 2, 2025
Homeक्राईम न्यूजहगवणेचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका; 'या' तीन विभागाचा कार्यभार...

हगवणेचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका; ‘या’ तीन विभागाचा कार्यभार घेतला काढून

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबईः वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाचे मामा आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप कस्पटे कुटुंबियांकडून करण्यात आला होता. त्यानंतर गृहविभागाने सुपेकर यांना दणका देत त्यांच्याकडून राज्यातील तीन महत्वाचे कार्यभार काढून घेतले आहे. गृहखात्याने नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षकाचा अधिकार सुपेकर यांच्याकडून काढून घेतला आहे.

आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हे हगवणे यांचे मामा आहेत. त्यांच्या जीवावर आम्ही काहीही करू शकतो, अशी धमकी हगवणे यांच्याकडून दिली जायची, असे वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी म्हटले आहे. तसेच जालिंदर सुपेकर यांची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आले होते. सुपेकर यांच्यावर आरोपींना मदत करत असल्याचा आरोप झाल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचा आरोप

या प्रकरणानंतर जालिंदर सुपेकर यांच्या अधिकारात कपात करण्यात आली आहे. सुपेकर यांच्याकडे राज्यातील तीन महत्वाच्या पदाचा कार्यभार होता. आता नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षकाचा अधिकार जालिंदर सुपेकर यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप झाल्यानंतर गृहखात्याने नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षकाचा अधिकार सुपेकर यांच्याकडून काढून घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments