Saturday, August 2, 2025
Homeक्राईम न्यूजस्वच्छ भारतात पुण्याची कमाल ! यादीत मिळाला आठवा मानाचा तुरा

स्वच्छ भारतात पुण्याची कमाल ! यादीत मिळाला आठवा मानाचा तुरा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : स्वच्छ भारत अभियनाअंतर्गत स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे शहराने आता एक पाऊल पुढे टाकत आठवा क्रमांक पटकावला आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेतील सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नागरिकांच्या सहभागामुळे हे यश मिळाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चे निकाल केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने नुकतीचे जारी केले असून, पुणे शहराने कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रभावी नियोजन यामुळे पुण्याने ही कामगिरी केली आहे. याशिवाय, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षणात इंदूरने सलग नवव्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर सूरत आणि नवी मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. पुण्याच्या या यशाबद्दल महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. पुणेकरांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून शहराला अधिक स्वच्छ आणि सुंदर बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. भविष्यातही असेच यश मिळवण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे. असं आयुक्तांनी यावेळी म्हंटल आहे.

गेल्या सहा वर्षांत पुण्याचा स्वच्छ शहराचा प्रवास

2019 मध्ये पुणे शहर 37 क्रमांकावर तर 2020 मध्ये पंधरा, 2021 मध्ये पाच, 2022 मध्ये नऊ, 2023 मध्ये नऊ आणि आता एक पाऊल पुढे टाकत 2024 मध्ये आठवा क्रमांक पटकावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments