इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः एकीकडे पुणे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावाजले जात आहे, तर दुसरीकडे नागरिक अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विशेषतः सार्वजनिक शौचालयांच्या दयनीय अवस्थेमुळे पुणेकरांचे जगणे कठीण झाले आहे.
शहरातील अनेक ठिकाणची शौचालये अत्यंत अस्वच्छ असून, दुर्गंधी, कचरा, गाळ व पाण्याचा अभाव ही सामान्य बाब झाली आहे. या घाणीतून नागरिकांना रोज जाताना आरोग्य धोक्यात येत आहे. महिला, वृद्ध आणि लहान मुलांना याचा विशेष फटका बसतो.
पावसाळ्यात ही परिस्थिती आणखीनच बिकट होते. शौचालयात पाणी साचते, त्यामुळे रोगराईचा धोका अधिकच वाढतो. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून फारशी दखल घेतली जात नाही.
“स्वच्छ भारत अभियान” फक्त पोस्टरपुरते न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, आणि पुण्यातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित शौचालयाची सुविधा मिळावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.