Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजस्टंटबाजी करणं भोवलं...! इंदापूरात दोन चार चाकी वाहनाला लटकून आरडा-ओरडा; सात जणांविरुद्ध...

स्टंटबाजी करणं भोवलं…! इंदापूरात दोन चार चाकी वाहनाला लटकून आरडा-ओरडा; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : इंदापूर शहरात जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर दोन चारचाकी वाहनातून स्टंटबाजी करणं चांगलंच अंगलट आलं आहे. इंदापूर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार लक्ष्मण पोपट साळवे यांनी इंदापुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवार (ता. 16) रोजी रात्री इंदापूर शहरातील जुन्या पुणे सोलापूर महामार्गावरील तुळजाभवानी मंदिराच्या समोर ह्युडाई कंपनीचे व्हेन्यु मॉडेलचे वाहन (नंबर MH42 BJ 6740) मध्ये चालक आणि 3 तरुण तसेच दुसऱ्या काळ्या रंगाची चार चाकी वाहन (नंबर नसलेले) त्यामध्ये चालक आणि दोन तरुण असे एकूण सात जण होते.

या सर्वानी स्वतःचा व इतरांच्या जिवीतास धोका निर्माण होईल, असे पध्दतीने धोकादायक परस्थितीत वाहनाचे खिडकीचे बाहेर लटकुन मोठमोठ्याने आरडा ओरडा करत स्टंटबाजी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच वाहने भरधाव वेगात चालवुन रस्ता वाहतुकीचे नियंमानकडे दुर्लक्ष केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments