इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
येरवडा, ता. 19 : बँकेच्या कामाकरिता जात असताना एका महिलेचीरिक्षात सोन्याचे दागिने व रोख रकम असलेली पर्स विसरल्याची घटना घडली होती. ही घटना येरवडा येथील गाडीतळ परिसरात सोमवारी (ता.19) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मात्र येरवडा पोलिसांनी दाखविलेल्या कार्यतप्तरतेमुळे रिक्षात हरवलेली पर्स पुन्हा त्या महिलेला ओळख पटवून देण्यात आली आहे.
सुहासिनी चंद्रकांत धोत्रे (वय 45, रा. सुभाष नगर, येरवडा) अशी पर्स परत दिलेल्या महिलेचे नाव आहे. धोत्रे या नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. धोत्रे या बँकेच्या कामाकरिता सोमवारी रिक्षातून येरवडा येथील गाडीतळाकडे चालल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ पर्स होती. त्या पर्समध्ये सोन्याची चेन व रोख रक्कम असे एकूण 1 लाख 9 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता.
दरम्यान, धोत्रे यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रिक्षा सोडला आणि बँकेतील काम करण्यासाठी गेल्या. बँकेतील काम आटोपून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, पर्स तर आपण रिक्षातच विसरलो होतो. त्यानंतर धोत्रे यांनी तत्काळ येरवडा पोलिस ठाणे गाठले. तेंव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील रवींद्र शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुर्वे, पोलीस अंमलदार कांबळे यांचे एक पथक तपासासाठी लावले.
धोत्रे यांनी रिक्षाचालकाला गुगल पे वरून पैसे दिले होते. त्यानंतर डी बी पथकाने तात्काळ चौकशी करून, रिक्षा शोधून काढली व त्यामधील पर्स मधील सोन्याची चैन व रोख रकमेची खात्री करून धोत्रे यांना परत केली आहे. यावेळी महिलेच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तर येरवडा पोलिसांनी दाखविलेल्या कार्यतप्तरतेमुळे महिलेला तिची पर्स अवघ्या काही तासाच्या आत मिळाली आहे. त्यामुळे येरवडा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.