Friday, June 6, 2025
Homeक्राईम न्यूजसॉरी, मला माफ करा, माझी जगायची इच्छा संपली आहे" हिंजवडीत २५ वर्षीच्या...

सॉरी, मला माफ करा, माझी जगायची इच्छा संपली आहे” हिंजवडीत २५ वर्षीच्या IT इंजिनिअर तरुणीची आत्महत्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी-चिंचवडः पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील हिंजवडी परिसरात एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या २५ वर्षीय अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या तरुणीने २१ मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना ३१ मे २०२५ रोजी पहाटे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाषा कोथंबिरे ही ‘द क्राऊन ग्रीन’ या उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीत राहत होती आणि हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. पहाटे सुमारे ४:३० वाजता ती दुचाकीने सोसायटीत आली आणि लिफ्टने थेट २१ व्या मजल्यावर पोहोचली. अवघ्या काही मिनिटांतच, म्हणजेच ४:४२ वाजता तिने इमारतीवरून उडी घेत जीवन संपवलं.

पोलीस तपासात अभिलाषाच्या खोलीतून एक सुसाइड नोट सापडली असून त्यामध्ये “सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेने करत आहे, माझी जगायची इच्छा संपली आहे.” असा मजकूर लिहिलेला आहे. ही चिठ्ठी वाचून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिलाषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यामध्ये तिच्या महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी, “अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, प्राथमिक तपासात कोणताही घातपात किंवा संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. आत्महत्या करण्यामागे मानसिक नैराश्य हे कारण असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.” अशी माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments