Monday, June 2, 2025
Homeक्राईम न्यूजसेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांची भरती; अर्ज कसा कराल?

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांची भरती; अर्ज कसा कराल?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत सध्या काउंसलर एफएलसी आणि बीसी सुपरवाइजर पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक आहे. सुपरवाइजर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. सेंट्रल बँकेच्या या नोकरीबाबत सविस्तर माहिती centralbankofindia.co.in या वेबसाइटवर दिली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन, बी.टेक, बी.ई, एम.एससी, एमबीए / पीजीडीएस किंवा एमसीए पूर्ण केलेले असावे. ही डिग्री प्राप्त असलेले उमेदवारच या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षे असावी. काउंसलर एफएलसी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ४५ ते ६५ असावी. काउंसलर एफएलसी पदासाठी २५,००० रुपये पगार मिळणार आहे. बीसी सुपरवाइजर पदांसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना १५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अधिकृत वेबसाइटवरुन अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर फॉर्म भरुन पाठवायचा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments