इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : रास्ता पेठेतील पावर हाऊस चौक व नाना पेठेतील इनामदार चौक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना समर्थ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सागर वसंत शिंदे (वय 30, रा. सुतार वाडी गावठाण) आणि सुबोजित राजेंद्र दास (वय 28, रा. राजेवाडी, भवानी पेठ, मुळगाव कोलु भागर, भद्रेश्वर, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) अशी आहेत.
रास्ता पेठेतील पावर हाऊस चौकात पार्क केलेली दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्याची तक्रार मिळाली होती. तपासाच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख आणि शरद घोरपडे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर शिंदे याला सुतार वाडीतून ताब्यात घेतले.
दरम्यान, इनामदार चौकातून दुकानासमोरून चोरीला गेलेल्या दुसऱ्या दुचाकीच्या तपासात सुबोजित दास याची नोंद आल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली. तपासादरम्यान दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
ही संपूर्ण कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेष रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहायक फौजदार अचारे, पागार आणि पोलीस अंमलदार रोहिदास वाघेरे, शिवा कांबळे, भाग्येश यादव यांनी केली.