Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजसिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्यापासून वाहतुकीसाठी खुला; नागरिकांना मोठा दिलासा

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्यापासून वाहतुकीसाठी खुला; नागरिकांना मोठा दिलासा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे या उड्डाणपुलावर डांबराचा शेवटचा थर मारला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. उद्घाटन होत नसल्याने याबाबत टीका केली जात होती. अखेर या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे.

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या गुरुवारी (ता. 15) सकाळी सात वाजता होणार आहे. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फन टाईम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे. त्यामध्ये राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलावरून वाहतुक सुरू करावी यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतरही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यावरून टीकेची झोड उठवली जात होती.

अखेर या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतुक कोंडीतुन सुटका होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments