इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून २ दुचाकी जप्त केल्या आहेत. ओंकार संतोष सातपुते (वय २० वर्ष, रा. लायगुडे वस्ती, धायरी), साईराज अतुल तावरे (वय १८ वर्ष, रा. कांबळे वस्ती, धायरी) अशी दुचाकी चोरट्यांची नाव आहेत. धायरी परिसरातून २ दुचाकी चोरीला गेल्यानंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरट्यांच्या मागावर पोलिसांचे पथक होते. तपास पथकातील पोलीस कर्मचारी मोहन मिसाळ आणि शिवा क्षीरसागर यांना सातपुते आणि तावरे यांनी दुचाकी चोरी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांनाही अटक केली. चौकशीत त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून चोरी केलेल्या दोन्ही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, मिसाळ, क्षीरसागर, राजू वेगरे, उत्तम शिंदे, स्वप्नील मगर, निलेश कुलथे, संग्राम शिनगारे यांनी सदरची कारवाई केली.