Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजसाहित्य संमेलनाचे बोधचिन्ह ठरले; राज ठाकरेंनी केली लोणी काळभोर येथील प्रसाद गवळींनी...

साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह ठरले; राज ठाकरेंनी केली लोणी काळभोर येथील प्रसाद गवळींनी रेखाटलेल्या बोधचिन्हाची निवड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : दिल्ली मध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह निश्चित झाले असून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील प्रसाद गवळी यांनी ते रेखाटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि लेखणी या बोधचिन्हात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते अशी संकल्पना आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये घेण्याचे नियोजित आहे.

या संमेलनाचे आयोजन पुण्यातील सरहद संस्थेकडून करण्यात येणार आहे. संमेलनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच संस्थेने बोधचिन्ह रेखाटण्याची स्पर्धा घेतली. या स्पर्धेतून संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड करण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे होती. संस्थेकडे आलेल्या सुमारे शंभरहून अधिक बोधचिन्हांतून गवळी यांच्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली आहे.

संस्थेने घेतलेल्या स्पर्धेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्राप्त झालेल्या बोधचिन्हांतून राज ठाकरे यांनी बोधचिन्ह निवडले. या बोधचिन्हात महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवरायांची राजमुद्रा असून पारंपरिक लेखणीही स्पष्ट दिसत आहे. हे बोधचिन्ह साधे आहे. त्यामुळे याची निवड करण्यात आली आहे. संमेलनात गवळी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

लोणी काळभोर येथील प्रसाद गवळी यांनी हे बोधचिन्ह रेखाटले आहे. गवळी हे ग्राफिक डिझायनर असून, मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अँड आर्ट या संस्थेचे ते संचालक आहेत. बोधचिन्हाच्या निर्मितीबाबत गवळी म्हणाले “बोधचिन्ह स्पर्धेची माहिती मिळताच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आतापर्यंत विविध कंपनी, कार्यक्रमांची बोधचिन्हे तयार केली आहेत. संमेलनासाठी मी पहिल्यांदा बोधचिन्ह तयार केले. शिवरायांची राजमुद्रा ही महाराष्ट्राची ओळख सांगणारी असून, साहित्याचे प्रतीक म्हणून पेनाची निब यामध्ये वापरली आहे”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments