इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : सासवड परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. अशातच आता सोनोरी रोड येथील स्वामी समर्थ सोसायटीमधील अथर्व निवासस्थानातून सोन्याचे नेकलेस, गंठण, वेढणी, सोन्याची बांगडी असा एकूण ४ लाख ७१ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रोहिणी सुधीर बडदे यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी शोभा भाऊसो बडधे (रा. कोडित) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी समर्थ सोसायटी अथर्व निवासस्थान सोनोरी रोड या ठिकाणी फिर्यादी रोहिणी बडदे या राहण्यास आहेत. त्यांच्या घरातील सोन्याचे नेकलेस, सोन्याचे गंठण, सोन्याची वेढणी, सोन्याची बांगडी असा एकूण चार लाख 71 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला आहे. घरात चोरीझाल्याचे लक्षात येताच त्यांनी सासवड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केलं आहे.
दरम्यान, त्यांची चुलत जाऊ शोभा बडधे यांच्यावर त्यांचा चोरी केल्याचा संशय असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून सासवड पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार अमोल लडकत यांनी गुन्हा दाखल करून घेतला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील व पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करत आहेत.