इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रांजणगाव गणपतीः शिरूर ता. सरदवाडी गावात औद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनींवर थेट परिणाम करणाऱ्या प्रस्तावित विद्युत लाईन प्रकल्पामुळे ग्रामस्थ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यात जोरदार वाद उसळला. या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याने गावात एकाच खळबळ उडाली होती.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, ही लाईन गावाच्या हद्दीतून आणि थेट शेतजमिनींमधून नेण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामुळे पीकहानी, शेतीवर परिणाम आणि भविष्यातील मालमत्ता नुकसान होत आहे. नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेत, “विकास नको, पण आमचं नुकसान चालणार नाही!” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दुसरीकडे, एमआयडीसीचे अधिकारी “हा शासकीय प्रकल्प असून, तो ठरलेल्या मार्गानेच राबवला जाणार,” असा ठाम पवित्रा घेत आहे. त्यामुळे गावात वातावरण तणावपूर्ण झालं असून शाब्दिक वादविवादही झाला आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधत परिस्थिती निवळवली असुन. ग्रामस्थांनी आपल्या मागण्या शांततेने मांडत, प्रशासनाकडे लेखी निवेदन दिलं आहे.
ग्रामस्थांची मागणी आहे की, वीज लाईन गावाच्या हद्दीबाहेरूनच जावी, त्यासाठी नकाशानुसार फेरआढावा घेण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.