Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजश्रीक्षेत्र नारायणेश्वर मंदिर जतन संवर्धनासाठी 6 कोटी निधी मंजूर

श्रीक्षेत्र नारायणेश्वर मंदिर जतन संवर्धनासाठी 6 कोटी निधी मंजूर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील पुरातन श्री नारायणेश्वर महादेव मंदिर जतन आणि संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या वतीने 6 कोटी 16 लाख 63 हजार 902 रुपयांचा निधी मंजूर केला. अशी माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.

यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पाठपुरावा केला होता. या निधीतून श्री नारायणेश्वर मंदिर जतन व संवर्धनासाठी मंदिर परिसरात विविध विकासकामे होणार आहेत.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना पुरातत्व विभागाच्या वतीने हा निधी मंजूर झाला असून लवकरच कामांचा शुभारंभ होणार आहे. याबद्दल श्रीक्षेत्र नारायणपूर येथील ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments