इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
इंदापूर : शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने पर्यावरण पूरक घरगुती गौरी गणपती आरास व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, शिवसेना पुणे जिल्हा महिला प्रमुख सीमा कल्याणकर यांनी दिली.
सदर स्पर्धेच्या पत्रकाचे अनावरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वाती ढमाले, छाया जगताप आदींसह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सीमा कल्याणकर यांनी सांगितले की, या स्पर्धचे दुसरे वर्षे आहे. इंदापूर, बारामती व दौंड या तालुक्यासाठी ही स्पर्धा असणार आहे. सदर स्पर्धा ही ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. स्पर्धकांनी 1 ते 3 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ पाठवायचा आहे. सदर व्हिडिओ हा शिवसेना महिला आघाडीच्या फेसबुक पेजवर फोटो व व्हिडिओ सर्व स्पर्धकांचे टाकले जाणार आहेत. ज्या व्हिडिओला जास्त लाईक व शेअर केले जाईल त्याचे जादा गुण धरले जाणार आहेत.
व्हिडिओ पाठविण्यासाठी अंतिम तारीख 19 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ 3 बक्षिसे प्रत्येक तालुक्यातून काढण्यात येणार आहेत. विजेत्यांना बक्षीस स्वरूपात आकर्षक भेटवस्तू तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सीमा कल्याणकर यांनी सांगितले.
स्पर्धकांनी 7796688214 या क्रमांकावर व्हिडिओ पाठवायचा आहे. या स्पर्धेत इंदापूर, बारामती व दौंड तालुक्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.