Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजशिरूर पोलिसांनी केली 4 जनावरांची सुटका ; तिघांवर गुन्हा दाखल

शिरूर पोलिसांनी केली 4 जनावरांची सुटका ; तिघांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती: छोटा हत्ती टेम्पोतून कत्तली साठी घेऊन जाणाऱ्या दोन गाय व दोन कालवडींची शिरूर पोलिसांनी सुटका केली असून या प्रकरणी तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुनाट (ता. शिरूर) हद्दीतील चौफुला चौकात शिरूर पोलिसांनी हि कारवाई करून गाई व टेम्पो असा तीन लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

विशाल राजाराम बिटके (वय 28, रा. बिटकेवाडी, कोतवालवस्ती, ता. कर्जत, जि. अहमदनगर), सलीम शेख (रा. दत्तवाडी, शिंदोंडी ता. शिरूर, जि. पुणे), अतिक गुलाब हुसेन कुरेशी (रा. श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. पुणे) असे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई ओकांर बापु शिरोळे यांनी फिर्याद दिली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास गुनाट गावच्या हद्दीत चौफुला चौकात छोटा हत्ती क्र. एम. एच 16 सी.डी. ८७९३ या मधुन वरील तीन आरोपी टेम्पोमध्ये दोन गाय व दोन कालवडी अशी 4 जनावरे घेऊन निघाले होते. यावेळी टेम्पोत क्रूरपणे कोंबुन त्यांना कोणत्याही प्रकारचा चारापाणी व्यवस्था केल्याचे आढळून आले नाही. तसेच जनावरांची वाहतुकी पुर्वी वैदयकीय तपासणी करणे बंधनकारक असताना जनावरांची कोणतीही वैदयकीय तपासणी न करता तसेच वाहतुकीचा कोणताही परवाना, न घेता कत्तलीसाठी घेवुन जात असताना मिळुन आले.

दरम्यान, पोलिसांनी दोन गाय व दोन कालवडी, एक छोटा हत्ती टेम्पो असा एकूण तीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे. वरील तीनही आरोपींविरुद्ध प्राण्यांना कुरतेने वागणुक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments