Saturday, August 30, 2025
Homeक्राईम न्यूजशिरूर तालुक्यातील शाळांमध्ये आता मुख्याध्यापकच करतील झेंडावंदन; झेंडावंदनावरून होणाऱ्या वादाला पूर्णविराम....

शिरूर तालुक्यातील शाळांमध्ये आता मुख्याध्यापकच करतील झेंडावंदन; झेंडावंदनावरून होणाऱ्या वादाला पूर्णविराम….

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

न्हावरे : शिरुर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांनीच झेंडावंदन करावे. या संदर्भात शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी तालुक्यातील सर्व शाळांना केंद्र व राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येथून पुढे जिल्हा परिषद शाळांमध्ये त्या शाळांचे मुख्याध्यापकच झेंडावंदन करणार आहेत.

अशाच पद्धतीचा ‘जीआर’ माध्यमिक शाळांच्या संदर्भातही असून, माध्यमिक शाळांमध्येही मुख्याध्यापकांनीच झेंडावंदन करावे. अशी मागणी शिरूर तालुका शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष योगेश ओव्हाळ पाटील यांनी केली आहे. त्यामुळे शाळा किंवा विद्यालयाचे प्रमुख हे मुख्याध्यापक असताना, त्यांना त्यांचा अधिकार बजावण्यापासून अलिप्त रहावे लागत होते. परंतू, स्थानिक पातळीवर शिरूर तालुक्यात शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार असल्यामुळे मुख्याध्यापकांना झेंडावंदन करणे शक्य होणार आहे. तसेच झेंडा वंदनावरून होणारे राजकारणही थांबणार असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

“दरम्यान, शिरूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे बंधनकारक असून, या संदर्भात काही त्रुटी आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्यात येईल.”

बाळकृष्ण कळमकर (गटशिक्षणाधिकारी शिरूर).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments