Sunday, June 1, 2025
Homeक्राईम न्यूजशिरूरमध्ये युवक गांजासह अटक; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिरूर : शिरूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात एका २१ वर्षीय तरुणास गांजाचे सेवन करताना शिरूर पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरात अमली पदार्थविरोधी गस्त घालत असताना एका बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका युवकाकडून गांजाचे सेवन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी पंचासमवेत सापळा रचून संशयितास रंगेहाथ पकडले.

संशयिताचे नाव सोहम बाबाजी गायके (वय २१, रा. साईनगर, शिरूर, जि. पुणे) असे असून, त्याच्याकडे एक चिलीम व गांजासारखा काळसर हिरवट पदार्थ आढळून आला. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार त्या युवकाची झडती घेतली असता, गांजासदृश पदार्थ आणि आगपेटी आढळून आली. सदर वस्तू पंचासमोर नष्ट करण्यात आल्या.

या प्रकरणी पोलीस अंमलदार नितेश दत्तात्रय थोरात यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु. एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप हे करीत असून, शिरूर पोलीस स्टेशनच्या परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया सुरू आहेत.

शहरात अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी शिरूर पोलीसांचे हे पाऊल उल्लेखनीय मानले जात आहे. मात्र, तरुण युवक अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे चित्र शिरूर शहर आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments