Thursday, July 31, 2025
Homeक्राईम न्यूजशिरूरमध्ये दशक्रिया घाटावर सुविधा मिळाव्यात यासाठी नाभिक समाज करणार प्रतीकात्मक मुंडन आंदोलन...

शिरूरमध्ये दशक्रिया घाटावर सुविधा मिळाव्यात यासाठी नाभिक समाज करणार प्रतीकात्मक मुंडन आंदोलन…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिरूर : शिरूर येथील दशक्रिया विधी घाट येथे नाभिक समाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या मागणीसाठी शिरूर शहर नाभिक संघटनेच्या वतीने सोमवार (ता. २८) दुपारी शिरूर तहसील कार्यालयासमोर प्रतीकात्मक मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा संघटनेचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी दिला आहे.

या आंदोलना संदर्भात शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शिरूर शहर नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष संतोष शिंदे, माजी उपाध्यक्ष गोरक्ष शिंदे, अजय गायकवाड, बबन वाघमारे इत्यादी नाभिक संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.

दशक्रिया विधी घाटावर नाभिक समाजाच्या कामासाठी मुंडन रुम, बसण्यासाठी बैठक व्यवस्था, कट्टे, शुद्ध पाण्याची सोय, विद्युत प्रकाश आदी मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने, नाभिक बांधवांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही शिरूर नगरपरिषदेने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. असा आरोप निवेदनात समस्त नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.

नाभिक समाजाच्या समस्या संबंधित प्रशासनाने प्राधान्याने सोडवल्या नसल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे प्रितेश फुलडाळे यांनी सांगितले.

तसेच प्रशासनाने लवकरात लवकर नाभिक समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी नाभिक समाजातून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments