Saturday, August 30, 2025
Homeक्राईम न्यूजशिरसगाव काटा येथे जबरी चोरी; १ लाख ४० हजरांचा मुद्देमाल लंपास

शिरसगाव काटा येथे जबरी चोरी; १ लाख ४० हजरांचा मुद्देमाल लंपास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिरूर : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा गावात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून जबरी मारहाण करत तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १० ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजल्यापासून ११ ऑगस्ट रोजी १२.३० च्या दरम्यान घडला. फिर्यादी अमोल अशोक कुंजीर (वय ३१, रा. चव्हाणवाडी, शिरसगाव काटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीने त्यांच्या आईला मारहाण करत सोन्याचे दोन गंठण ८० हजार रुपये कानातील फुले व वेल ४० हजार रुपये आणि मनी मंगळसुत्र २० हजार रुपये असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments