इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन : उरुळी कांचन ते जेजूरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ११७ या रस्त्यावरील शिंदवणे (ता. हवेली) कॅनॉल क्रॉसिंगवरील पुल फार जूना झाला असून तो वाहतुकीस धोकादायक झाला आहे. त्यामुळे या पुलावरून जड-अवजड वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
शिंदवणे कॅनॉल क्रॉसिंगवरील पुल किमी ८९/७१७ हा जड-अवजड वाहतुकीस धोकादायक झाला आहे, अशी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सदर ठिकाणी पहाणी करुन वस्तुनिष्ठ प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व शासन गृह विभागाचे दि.१९/०५/१९९० चे अधिसूचनेनुसार खालील प्रमाणे वाहतुक वळविण्याचे आदेश दिले आहेत.
असे आहेत वाहतुकीत बदल
उरुळी कांचन कडून जेजूरी व सासवड कडे जाणारी जड-अवजड वाहतूक पूर्ण पणे बंद करून सदरची वाहतुक यवत-माळशिरस टेकवडी-राजेवाडी-वाघापुर चौफुला मार्गे वळविण्यात आली आहे. जेजूरी व सासवड कडून सोलापुर कडे जाणारी जड-अवजड वाहतुक पूर्णपणे बंद करुन सदरची वाहतुक वाघापुर चौफुला-यवत मार्ग वळविण्यात आली आहे. तर जेजूरी सासवड कडून पुणे व शिक्रापूर येथे जाणारी जड-अवजड वाहतुक पुर्णपुणे बंद करून सासवड-हडपसर मार्गे वळविण्यात आली आहे.