इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नागपूर: नागपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका शासकीय कंत्राटदाराने वेळेत थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या राजनगर येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पीव्ही वर्मा असं या कंत्राटदाराचं नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या कंत्राटदाराचे जवळपास 30 कोटी रुपयांचे थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होते. त्यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्ही वर्मा यांचे वर्धा जिल्ह्यात एमआयडी देवळी येथे काम सुरु आहे. या कामाचे जवळपास तीस कोटी रुपयांचे थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होते. शासनाकडून थकीत बिल न मिळाल्याने आर्थिक संकट ओढावल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले.