Saturday, July 12, 2025
Homeक्राईम न्यूजशहरात विकास की जीव धोक्यात? पुण्यात ड्रेनेज अपघातात शाळकरी मुलगी गंभीर जखमी

शहरात विकास की जीव धोक्यात? पुण्यात ड्रेनेज अपघातात शाळकरी मुलगी गंभीर जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पावसाच्या दिवसात रस्त्यांची झालेली दुरावस्था आता एक गंभीर समस्या बनली आहे. नुकतीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरचा संताप वाढला आहे. कसबा पेठेतील दारूवाला पुलाजवळ रस्त्याच्या कामादरम्यान, मोठी घटना घडली आहे.

याठकाणी रस्त्याचे काम सुरु असताना एक लोखंडी खांब एका शाळकरी मुलीच्या डोक्यावर पडल्याने तीला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून, तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

ही घटना घडल्यानंतर कसबा पेठेतील नागरिक संतप्त झाले असून, रस्त्याचे काम सुरु असताना सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप करत या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, याठिकाणी रस्ता खोदून ड्रेनेज पाइप टाकण्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या बाजूला ठेवलेले लोखंडी खांब कोसळून थेट पादचारी मार्गावर पडले. या घटनेत मुलीच्या डोक्यावरही एक खांब पडला ज्यात गंभीर झाली. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments