Tuesday, June 3, 2025
Homeक्राईम न्यूजव्हॉट्सअॅप हॅक करून आर्थिक फसवणूक; सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

व्हॉट्सअॅप हॅक करून आर्थिक फसवणूक; सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्हॉट्सअॅप हॅक करून आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. येथे अज्ञात गुन्हेगारणे नातेवाईकच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप हॅक करून स्वतः नातेवाईक असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केली. याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादिवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आरुद्रा यज्ञनारायणा कुचिभटला (वय 54, रा. नन्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने 27 एप्रिलला आरुद्रा यांच्या नातेवाईकाचे व्हॉट्सअॅप हॅक केले. त्यानंतर आरोपीने स्वतः संबंधित नातेवाईक असल्याचे भासवले आणि फिर्यादीकडे 80 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भजनावळे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments