Tuesday, June 3, 2025
Homeक्राईम न्यूजवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण..! माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची...

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण..! माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी या अटक केलेल्या आरोपींकडे आश्रय घेतला असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (26 मे) रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली आहे.

प्रीतम वीरकुमार पाटील (47, कोगनोली, तहसील चिकोडी, बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्या माजी मंत्र्याच्या मुलाचे नाव आहे. त्याच्यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय 60 वर्ष, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फटक (वय 55 वर्ष, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35 वर्ष, पुसेगाव, खटाव, सातारा), राहुल दशरथ जाधव (वय ४५ वर्ष, पुसेगाव, खटाव, सातारा) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अधिक माहिती अशी की, वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे दोघेही फरार होते. त्यांना 7 दिवसानंतर स्वारगेट मधून अटक करण्यात आली. दरम्यान त्यांनी वडगाव, मावळ, लोणावळा, सातारा तसेच महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर आश्रय घेतल्याचे तपासात उघड झाले. त्यावरून माहिती काढत पोलिसांनी आरोपींना आश्रय देणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments