Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजविजेचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह दौंडच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस

विजेचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह दौंडच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दौंड : गेली महिनाभर पावसाने चागलीच उघडीप दिली होती. मात्र, सोमवारपासून अचानक वातावरणात बदल झाला आणि विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह दौंडच्या पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, सोमवारी (दि. 23) सकाळपासूनच सूर्य दर्शन झाले नव्हते.

त्यात सकाळपासूनच दिवसभर पाऊसाच्या सरी येत होत्या. पण, आचानक सायकाळी 5 च्या सुमारास एक तास पावसाने तुफान झोडपले. साधारण केडगाव, गलांडवाडी, एकेरीवाडी, खुटबाव, राहू, देलवडी, पारगाव परिसराला जोरदार पावसाने चांगलेच झोडपले.

तोडणीला आलेले ऊस भुईसपाट

मागील महिना भर पावसाने उघडीप दिल्याने काही भागात ऊसतोडणी तोडणी सुरू होती. पण, अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने ऊस भुई सपाट झाले आहेत. तर काही ठिकाणी शेतातील झाडे उन्मळून पडली आहेत. पावसासह वारा जास्त प्रमाणात असल्यामुळे तरकारी पिकांचेही जागोजागी नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments