इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुन प्रकरणात हत्यारे पुरवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हत्याप्रकरणात आरोपींची संख्या आता 15 पुरुष व 1 महिला अशी मिळून १६ झाली आहे. तर पोलिसांनी याअगोदर तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. संगम संपत वाघमारे (वय-20, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर यांचा खून करण्यासाठी आरोपींनी वापरलेले पिस्तूल आणि कोयते कोठून व कोणाकडून आणले आहेत. याबाबत गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांचे सहकारी तपास करीत होते. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना, पथकातील पोलीस हवालदार जाधव, मोकाशी यांना आंदेकर खुन प्रकरणात हत्यारे आणणे व पुरवणारा आरोपी संगम वाघमारे हा आंबेगाव पठार परिसरात येणार आहे. अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी संगम वाघमारे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने त्याचे मित्र आकाश म्हस्के, अनिकेत दुधभाते यांच्याकडून हत्यारे घेवुन आल्याचे सांगितले आहे. सदर गुन्हयात आरोपी संगम वाघमारे याने हत्यारे आणणे, पुरवणे यामध्ये महत्वाची भुमिका बजावली आहे. आरोपीस न्यायालयात हजार केले असता, न्यायालयाने आरोपी वाघमारे याला 11 सप्टेंबर पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.