इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे शहरातील अनेक भागांत आज कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. वडगाव जलकेंद्रावर महावितरण कंपनीकडून देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने हा परिणाम जाणवेल. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
आज दुपारी 12 ते 2 या वेळेत महावितरणकडून दुरुस्तीचे काम केले जाईल, ज्यामुळे वडगाव जलकेंद्रातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद राहील. याचा परिणाम प्रामुख्याने हिंगणे, धायरी, कात्रज, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी यासह इतर काही भागांवर होईल. सच्चाई माता टाकी, संतोष नगर, वंडर सिटी, बालाजी नगर, सुखसागर नगर (भाग 1 व 2) तसेच कात्रज गावठाण, भारत नगर या परिसरांनाही कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.