Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोर व कदमवाकवस्तीचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ पालखी सोहळा; गुलालाची उधळण करत...

लोणी काळभोर व कदमवाकवस्तीचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ पालखी सोहळा; गुलालाची उधळण करत रामदरा येथे थाटामाटात पोहचला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : परिसरात भरपूर पाऊस पडावा म्हणून वरूण राजाची प्रार्थना करण्यासाठी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात गुरुवारी (ता. 8) बारा वाजण्याच्या सुमारास वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या वनभोजनाच्या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. अशी माहिती श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.

लोणी काळभोर व कदमवाकवस्तीचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथची पालखी दरवर्षीप्रमाणे विठ्ठल मंदिरापासून तीर्थक्षेत्र रामदरा येथे नेण्यात आली. सकाळी दहा वाजता पालखी सोहळा अंबरनाथच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे निघाला. या सोहळ्यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुलालाची उधळण करत, विविध संतांचे अभंग गात सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र रामदरा येथे हा पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात पोहचला.

रामदरा येथे पालखी सोहळा पोहचल्यानंतर विधिवत पूजा महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. तर हभप विनोद महाराज काळभोर व दत्तात्रय महाराज काळभोर यांच्या हस्ते करण्यात आली. रामदरा येथील राममंदिरात आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन डोंगरावरील गोवर्धन पर्वताची पुजा करण्यात आली. त्यानंतर तीर्थक्षेत्र रामदरा येथील महंत हेमंतपुरी महाराज यांच्या वतीने उपस्थितांना भात, आमटी, शिरा, जिलेबी, लाडूचा महाप्रसाद देण्यात आला. याबरोबरच भाविकांनी आपापल्या घरुन पुरण पोळी आणली होती. यावेळी एकमेकांना आग्रह करून पुरणपोळी खायला देण्यात आली.

दरम्यान, भोजन झाल्यावर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात अंबरनाथाची दोन्ही मंदिरे, महादेव, विठ्ठल व मारुतीच्या मंदिरात आरती झाली. त्यानंतर पालखी परत ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या जुन्या मंदिरात आली. तेथे आरती होऊन वनभोजनाची समाप्ती झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments