इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्ट लोणी काळभोरच्या अध्यक्षपदी हेमंत गंगाराम गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष नरसिंग काळभोर यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी सूर्यकांत दत्तात्रय काळभोर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष योगेश प्रल्हाद काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्री काळभैरवनाथ अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्ट लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या नवनिर्वाचित विश्वस्तांची रविवारी (ता. 27) बैठक घेण्यात आली होती. यामध्ये हेमंत गंगाराम गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सेक्रेटरीपदी बाळासाहेब जयवंत काळभोर तर खजिनदार पदी विलास रामदास काळभोर यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथच्या वार्षिक उत्सवानिमित्त श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्ट लोणी काळभोर व कदमवाकवस्ती अनेक कार्यक्रम आयोजित करतात.
दरम्यान, एप्रिलमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी अंबरनाथाची महापुजा संपन्न होते. यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत गंगाराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांना अनेक कार्यक्रम पाहायला मिळेल, याची आशा आहे.