इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर : पुणे येथील साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंगमहाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) गावाची मंगळवारी (ता. १) स्वच्छता केली. तसेच गावातून रॅली द्वारे नागरिकांना स्वच्छतेचे व पर्यावरण सुरक्षितेचे धडे देऊन जनजागृती केली आहे. नर्सिंग महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
पर्यावरण जगवा वसुंधरा वाचवा या अभियानाअंतर्गत लोणी काळभोर येथे स्वच्छता पंधरवडा मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्ष पोस्ट बेसिक बी एस सी नर्सिंग व ५ सेमिस्टर बी एस सी नर्सिंगच्या अशाएकूण ४१ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता व पर्यावरण संरक्षण या विषयावर पथनाटय सदर करून उपस्थित नागरिकांना माहिती सांगितली. या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. तसेच स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचे महत्व नागरिकांना पटवून देऊन प्रबोधन केले.
साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅली द्वारे स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. कचरा कुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू. पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा. स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर. स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजारपण. स्वच्छता शिका, आरोग्याला जिंका. ठेवा साफसफाई घरात, हेच औषध सर्व रोगात. स्वच्छता हीच खरी सेवा. स्वच्छता असेल जिथे, आरोग्य वसेल तिथे. कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी. घरादाराची स्वच्छता, हीच गावची मालमत्ता. निसर्गाचे नियम पाळा, प्लास्टिकचा वापर टाळा. असे वेगवेगळे फ्लेक्स हातात धरून समाजोपयोगी संदेश दिले.
दरम्यान, विद्यार्थिनींना यासाठी साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राध्यापिका रुपाली शिंदे, शोभा पाटील, विद्या आढाव, स्टेफिना फर्नांडिस आणि प्रियांका कदम यांच्या बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.